गुड न्यूज : राज्यात एका दिवसांत १२०० रुग्ण कोरोनामुक्त

1200 रुग्ण बरे झाल्याची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे.

Updated: May 19, 2020, 10:46 PM IST
गुड न्यूज : राज्यात एका दिवसांत १२०० रुग्ण कोरोनामुक्त title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब समोर येत आहे. आज एकाच दिवसांत राज्यात 1200 रुग्ण कोरोनातून बरे झाले असल्याची महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. एकाच दिवसांत 1200 रुग्ण बरे झाल्याची ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 25 टक्के इतका असून राज्याचा मृत्यू दर हा 3.2 टक्के असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पावसाळा जवळ आला असताना इतर आजारांच्या उपचारासाठी डॉक्टरांनी खासगी दवाखाने सुरु करावेत, यासाठी शासन आणि डॉक्टरांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिवांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात समन्वय समिती नेमण्यात आली. रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट थांबविण्यासाठी दरनियंत्रण कायदा केला असून त्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी प्राधीकारीही नेमले असल्याचं ते म्हणाले. शिवाय आरोग्य विभागातील 17 हजार रिक्त पदं दोन महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात दिवसभरात 15 हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी 67 प्रयोगशाळा काम करत आहेत. राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी साधनांची कमी नाही. गेल्या काही दिवसंपासून बीकेसी, वरळी डोम, गोरेगाव येथे कोरोना केअर सेंटर्सची उभारणी केली जात आहे. 

भारतात कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग मंदावला; रिकव्हरी रेटही सुधारला

मालेगावातील कोरोना परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी तेथील मृत्यूदर कमी होत असल्याचं सांगितलं. तेथे खासगी दवाखाने बंद असल्याच्या काळात मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. मात्र तेथे जाऊन डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली, त्यांना विश्वासात घेतल्यानंतर खासगी दवाखाने सुरु झाले. आता त्याचे परिणाम दिसू लागले असून मृत्यू दर खाली आला आहे. राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या मालेगावमध्ये टेली रेडीओलॉजी सुरु करण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली वागणूक द्यावी. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं ही आजची गरज असून कोरोना रुग्णांना वाईट वागवू नका, मुंबई, पुण्याहून येणाऱ्या नागरिकांशी चांगलं वागण्याचं आवाहन राजेश टोपे यांनी जनतेला केलं आहे. 

 

coronavirus: भारताची स्थिती काय आहे? WHOकडून आकडे जाहीर