राज्यात १२३० नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजारांवर

राज्यात एकूण 4 हजार 786 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Updated: May 11, 2020, 10:08 PM IST
राज्यात १२३० नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा २३ हजारांवर title=

मुंबई : देशात सर्वाधित कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या 24 तासात 1230 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 401वर पोहोचली आहे. 

गेल्या 24 तासात 36 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून राज्यात एकूण 868 जण कोरोनामुळे दगावले आहेत. 

आज एका दिवसांत 587 रुग्ण बरे झाले असून राज्यात एकूण 4 हजार 786 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

राज्यातील 23 हजारांपैकी सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईत आतापर्यंत 14 हजार 521 जणांना कोरोनाची लागण झाली असून 528 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील धारावीत कोरोनाचे ५७ रुग्ण वाढले असून धारावीत कोरोना रुग्णांची संख्या ९१६ वर पोहोचली आहे. शिवाय एकून २९ जाणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

कल्याण-डोंबिवलीत 366, नवी मुंबई 898, ठाणे 125 तर ठाणे मनपात 927 रुग्ण आढळले आहेत.  

मीरा-भाईंदर 214, वसई-विरार 249, रायगड 123, पनवेल 139, मालेगावमध्ये 596 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक आहे. पुणे 166 तर पुणे मनपात 2476 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरी-चिंचवड मनपात 147 जण कोरोना पॉझिटिव्ह असून पुण्यातील वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.

राज्यात 2 लाख 48 हजार 301 जण होम क्वारंटाईन असून 15 हजार 192 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.