मुंबई : उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर आणखी दोन १५ डब्यांच्या गाडया चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गाडयांच्या २० हून अधिक फे-या होणार असून जुलै महिन्यात नवे वेळापत्रक लागू होणार आहे. त्याआधी जादाचे डबे चालवण्याकरिता रेल्वेला नव्या गाडयांची गरज आहे. या नव्या गाडया जुलैपूर्वी ताफ्यात दाखल करण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार आहे.
प्रवासी क्षमता वाढवण्याकरिता १५ डबा गाडया वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. प्रवाशांची वाढणारी संख्या आणि १५ डबा गाडयांमध्ये सामावणारे प्रवासी पाहता पश्चिम रेल्वेने आणखी दोन १५ डबा गाडया चालवण्याचा निर्णय घेतला आहे.