राजभवनात कोरोनाचा शिरकाव; १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

राजभवनातील तब्बल १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.     

Updated: Jul 12, 2020, 09:08 AM IST
राजभवनात कोरोनाचा शिरकाव; १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  title=

मुंबई : फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आता हा धोकादायक विषाणू राजभवनापर्यंत पोहोचला आहे. राजभवनातील तब्बल १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे तर इतरांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे राजभवनात सध्या चिंताजनक वातावरण आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे. 

राजभवनातील १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच समस्त कुटुंबियांची देखील कोरोना चाचणी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान सर्वप्रथम राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली. 

त्यानंतर राजभवनातील  १०० कर्मचाऱ्यांची  कोरोना चाचणी करण्यात आली. हे सर्व कर्मचारी राजभवर परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.