close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

बीकेसीच्या रस्त्यावर सहा फुटी अजगर

पोलिसांनी लगेच सर्पमित्रांना फोन करून बोलावले.

Updated: Jul 12, 2018, 10:26 PM IST
बीकेसीच्या रस्त्यावर सहा फुटी अजगर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरु असलेली मेट्रोची कामे आणि मुसळधार पाऊस यामुळे अनेक सरपटणारे प्राणी विस्थापित झाले आहेत. त्यामुळे हे प्राणी थेट मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागले आहेत. बुधवारी रात्री मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात रस्त्यावर सहा फुटी अजगर आढळला. वांद्रे- कुर्ला संकुलात गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री अडीचच्या सुमारास हा अजगर दिसला. या रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करत असतात. या वाहनांखाली येऊन अजगर चिरडला जाण्याची शक्यता होती. 

त्यामुळे पोलिसांनी लगेच सर्पमित्रांना फोन करून बोलावले. त्यांनी या अजगराला सुरक्षितपणे पकडले. सकाळी या अजगराला ठाणे वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आले.