मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात ६४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकाच दिवसात १२ रुग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. आज गुजरातमधून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एक कर्मचारी विमानतळावरील कर्मचारी आहे. आणि एक पुण्यातील महिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरीच राहावे, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सगळ्यांनी घरीच राहून सर्वांना पोहोचणारा धोका टाळा, असे आवाहनही करण्यात आले आहे. उद्या जनता कर्फ्यु आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, योग्य ती घबरदारी घेण्याचेही सूचविण्यात आले आहे.
#BreakingNews । महाराष्ट्रात ६४ रुग्ण । वाढलेल्या तीन रुग्णांमध्ये
एक रुग्ण हा विमानतळावरील कर्मचारी । दुसरा रुग्ण पुण्यातील ४१ वर्षांची महिला । । तिसरा रुग्ण गुजरातमधून महाराष्ट्रात आलेला आहे#Corona #Coronavirus #Covid_19 @ashish_jadhao #CoronaVirusinMaharashtra #Maharashtra pic.twitter.com/IPUZ5vdcaS— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 21, 2020
संपूर्ण देशात उद्या (Janta Curfew India) जनता कर्फ्यु आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अहमदनगर, यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद, उल्हासनगर या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक दिवस जनता कर्फ्यूची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकान आणि कार्यालयांना टाळे असणार आहे. तर सरकारी कार्यालयात २५ टक्के कर्मचारी उपस्थित आहे.
दरम्यान, पुण्याहून आलेल्या विशेष रेल्वेने परतले शेकडो विद्यार्थी परतीच्या वाटेवर आहेत. पुण्यात लॉक डाऊन झाल्यावर मूळ गावी विद्यार्थी परतले. चंद्रपूर रेल्वेस्थानकावर वैद्यकीय तपासणी-थर्मल स्क्रिनिंगची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन-रेल्वे-आरोग्य यंत्रणा-मनपा यांचा पुढाकारातून ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात अधिक धोका आणि स्वतःची काळजी यामुळे हे विद्यार्थी परतले आहेत. चिंताग्रस्त पालक विद्यार्थ्यांना सोबत करण्यासाठी स्थानकावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सर्व पुणे रिटर्न मुलांच्या हातावर Home Quarantine चे शिक्के मारण्यात आले आहेत.