लग्नात काकांचा Swag Mood : व्हिडिओ व्हायरल

मुंबई : सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरू आहे. लग्न म्हटलं की नाचं गाणं आलंच. घरात लग्न म्हटलं की सगळ्यांमध्ये उत्साह असतो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजणच लग्नाचा आनंद साजरा करत असतो. आता लग्नांमध्ये संगीतचा ट्रेंड आला आहे. अगदी मराठमोळ्या लग्नांमध्ये देखील संगीतचा कार्यक्रम केला जातो. या लग्नांमध्ये घरातील मंडळी खास डान्स बसवतात. आणि वर - वधुला सरप्राईज देतात. अशा संगीतातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक काका गोविंदाच्या "आपके आ जाने से" या गाण्यावर डान्स करत आहे. गोविंदा म्हटलं की आपल्याला अंदाज येईल त्याच्या सिनेमातील गाणी आणि त्याचे डान्स. आजही गोविंदाची गाणी आवडीने पाहिली जातात. कारण गोविंदाचा डान्स. असाच या काकांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डान्सवर अनेकांनी कमेंट केले आहेत. अगदी काकांचा Swag mood प्रत्येकालाच भावला आहे.  

सध्या हा व्हिडिओ फेसबुक, यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.