सीएसएमटी स्थानकात लोकलला अपघात

सीएसएमटी स्थानकात  लोकल बफरवर आदळली.  

Updated: Aug 30, 2019, 08:07 PM IST
सीएसएमटी स्थानकात लोकलला अपघात title=

मुंबई : सीएसएमटी स्थानकात दुपारी अडीच वाजता फलाट क्रमांक तीन वर आलेली लोकल बफरवर आदळली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. लोकलमधून प्रवासी उतरल्यानंतर ही लोकल बफरवर आदळली.

घडलेल्या या घटनेची मध्य रेल्वे मार्फ़त चौकशी केली जाणार आहे. ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये रवाना करण्यात आली आहे. दरम्यान, याआधीही लोकल बफरला धडकली होती. ती थेट फलाटावर चढली होती.