मुंबई : अलिकडेच मुंबई हायकोर्टाने अॅसिड हल्ल्यात दोषी असणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त केले आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या दोषी इसमाने पीडितेशी लग्न केले. इतकंच नाही तर प्लास्टिक सर्जरीसाठी तो पीडितेला त्वचादान करणार आहे.
यावर दोषी अनिल पाटीलने सांगितले की, परस्पर सहमतीने दोघांमध्ये सर्व सुरळीत झाले आहे आणि आता मी शांतीपूर्ण आयुष्य जगू इच्छितो.
वृत्तानुसार, डिसेबंर २०१३ मध्ये खेड सेशन कोर्टाने कलम 326 च्या अंतर्गत अॅसिड फेकल्याच्या आरोपाखाली अनिल पाटील यांनी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्याला २५ हजारांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर अनिलने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला.