मराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज

आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

Updated: Jan 3, 2019, 09:48 PM IST
मराठी सिनेमाला प्राईम टाईम सोडा साधी स्क्रीन नाही, महेश मांजरेकर नाराज  title=

मुंबई / नाशिक : आजही मराठी राज्यात मराठीची गळचेपी सुरु आहे. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही. मात्र, हिंदी भाषिक सिनेमाला त्यासाठी प्राधान्य दिले जाते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दिव्ंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्यावर ‘भाई: व्यक्ती की वल्ली’हा मराठी सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र, सिनेमला प्राईम टाईम तर नाहीच. तसेच ‘सिम्बा’ला तिप्पट स्क्रीन मिळत असताना या सिनेमाला स्क्रीन देण्यास सिनेमागृह मालकांनी नकार दर्शविलाय. त्यामुळे मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व लेखक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा पाहाण्यासाठी मराठी प्रेक्षक उत्सुक आहेत, तर दुसरीकडे पुलंच्या  महाराष्ट्रात त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची दुर्दैवीबाब पुढे आली आहे. 

28 डिसेंबर 2018 ला प्रदर्शित झालेल्या ‘सिम्बा’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या  सिनेमाने आतापर्यंत एकूण 140 कोटींची कमाई केली आहे. 50 कोटी तर एकट्या मुंबईत कमावलेत. सिम्बाला जास्तीत जास्त स्क्रीन मिळाव्या यासाठी‘सिम्बा’चे वितरक सिनेमागृहांच्या मालकावर दबाव टाकत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा फक्त पुलंवरच्या सिनेमाचा प्रश्न नाही तर मराठी सिनेमांमध्ये विविध वेगळे विषय मांडले जात असतानाही त्यांना न्याय मिळत नाही. त्याविरोधात कोणी आवाजही उठवत नाही. एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही. मराठी सिनेमाला असा दुजाभाव का, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, आज मांजरेकर यांनी नाशिकमध्ये तशी खंत बोलून दाखवली. नाशिकमध्ये मराठी चित्रपटाला शोज मिळत नसल्याने चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. सुट्यांच्या हंगामाच्या काळात मल्टिप्लेक्स दुर्लक्ष करत असल्याचे आरोपही केला. मराठी भाषा पंधरवडा सुरू असताना मराठीची गळचेपी होत आहे. हा कुसुमाग्रज आणि फाळकेंच्या नगरीत मराठीबाबत दुजाभाव दिसून येत आहे, असे दु:ख मांजरेकर यांनी नाशिकमध्ये मांडले.