मुंबईत मध्य रेल्वेवर १५० तर पश्चिम रेल्वेवर १४८ लोकलच्या फेऱ्या वाढल्या

लोकलच्या फेऱ्या वाढल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Updated: Jul 1, 2020, 04:38 PM IST
मुंबईत मध्य रेल्वेवर १५० तर पश्चिम रेल्वेवर १४८ लोकलच्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : मुंबईत उद्यापासून लोकलच्या आणखी फेऱ्या वाढणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे लोकल सुरु करण्याची मागणी केली होती. लोकल सुरु झाल्यानंतर ही सोशल डिस्टंसिंगचं पालन होताना दिसत नव्हतं. कारण लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने १ जुलैपासून लोकलच्या फेऱ्या आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या विद्यमान 200 फेऱ्या मध्ये आणखी 150 फेऱ्यांची वाढ होणार आहे. ज्यामुळे आता मध्य रेल्वेवर एकूण 350 लोकलच्या फेऱ्या होणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या 202 फेऱ्यामध्ये आणखी 148 फेऱ्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेवर एकूण 350 फेऱ्या होणार आहे. 

राज्य सरकारने सूचित केलेल्या प्रवाशांसाठी आणि अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. सर्वसामान्य प्रवासी यांना यातून प्रवास करता येणार नाही.

संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, आयकर, जीएसटी आणि कस्टम, टपाल विभागातील कर्मचारी, राष्ट्रीयकृत बँकेचे कर्मचारी, मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी, न्यायपालिका आणि राजभवन यांचे कर्मचारी यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार नाही.