Mhada Affordable Homes in Mumbai: आजच्या घडीला मुंबईत घर घेणं हे सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की नोकदारवर्गाला घर विकत घेणे परवडतच नाही. यामुळे अनेकजण भाड्याने राहणे पसंत करतात. नागरिकांना परवडणाऱ्या किंमतीत घरे मिळावीत म्हणून म्हाडा वेळोवेळी लॉटरी काढत असते. पण ही घराच्या किंमतीचा अकडादेखील इतका मोठा आहे की तिथपर्यंच पोहोचणं सर्वसामान्यांना परवडत नाहीय. त्यामुळे म्हाडाचे अनेक फ्लॅट्स विक्री विनाच राहिले आहेत. या न विकल्या गेलेल्या घरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
मुंबईतील न परवडणाऱ्या घरांबाबत म्हाडा नवा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विकल्या न गेलेल्या म्हाडाच्या महागड्या घरांबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. महागड्या किमतीमुळे बांधलेली घरे धूळ खात पडली आहेत. महागड्या घरांच्या किंमती कमी करून सदनिका विकण्याचा विचार म्हाडा करत आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी 'झी 24 तास'ला यासंदर्भात माहिती दिली आहे.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, EWS गटातील घरांच्या किंमती साधारण 30 लाखांपासून सुरू होत आहेत. तर, 3 BHK घरं उच्च गटातील असून या घरांची किंमत 1 कोटींच्या आसपास आहे. 3 बीएचके घरांच्या किंमती अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटींच्या आसपास या घरांच्या किंमती असू शकतात.
-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असेल त्यांना EWS (अल्प गटा)साठी अर्ज करता येणार आहे.
- ज्या कुटुंबाचे उत्पन्न 6 लाख ते 9 लाखांपर्यंत आहे त्यांना LIG (अत्यल्प गट)साठी अर्ज करता येणार आहे.
- कौटुंबिक उत्पन्न 9 लाख ते 12 लाखापर्यंत आहे ते MIG (मध्यम गट)साठी अर्ज करता येणार आहे.
- कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना HIG (उच्च गट)साठी अर्ज करता येणार आहे.
पती आणि पत्नी या दोघांचे वार्षिक उत्पन्न मिळून कुटुंबाचे उत्पन्न धरले जाते. व्यक्तींच्या पालकांचे किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.