मुंबई : माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (Shankarrao Chavan) यांची दुसरी आणि चव्हाण कुटुंबाची एकूण तिसरी पिढी ही राजकारणात (Maharashtra Politics) पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय आहे. माजी मुख्यमंत्री आणि जलक्रांतीचे जनक शंकरराव चव्हाण यांची नात आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan Daughter) यांची मुलगी श्रीजया (Shrijaya Chavan) राजकारणातून नव्या इनिंगला सुरुवात करणार असल्याचं समजतंय. सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरुय. या यात्रेतून श्रीजया राजकीय पदार्पण करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दरम्यान या निमित्ताने आपण चव्हाण कुटुंबियाची राजकीय कारकीर्द जाणून घेणार आहोत. (after shankarrao chavan and ashok chavan now 3rd genration of chavan family in politics)
शंकरराव चव्हाण यांनी 1975-1977 आणि 13 मार्च 1986 ते 24 जून 1988 या कालावधीत 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर त्यांना केंद्रात सेवा करण्याची संधी मिळाली. शंकररावांनी 1987 ते 1990 या 3 वर्षात अर्थमंत्री म्हणून कारभार पाहिला. तसेच पी व्ही नरसिंहराव आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणूनही काम केलं. राज्यात यशस्वीरित्या आपल्या कामाची छाप पाडल्यानंतर त्यांनी केंद्रातही आपला ठसा उमटवला.
शंकरराव यांनी यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातही पाटबंधारे विभागाचे कामकाज पाहिलं होतं. त्यामुळे त्यांना त्या विभागाचा अनुभवही होता. शंकरराव हे दूरदृष्टीचे नेते होते याची प्रचिती त्यांनी घेतलेल्या निर्णयावरुन येते. राज्यात जलसंधारणाचं काम झालं नाही, तर भविष्यात महाराष्ट्राचं वाळवंट होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी पाटबंधारे विभागात भरीव योगदान दिलं. त्यामुळे शंकररावांना 'जलक्रांतीचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. इतकंच नाही, तर सध्याच्या मुंबईतील मंत्रालंय असं नामकरणही त्यांनीच केलं. आधी मंत्रालयाचं नाव सचिवालय असं होतं.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी खासदार आणि दिग्गज नेते अशी अष्टपैलू ओळख असलेले अशोक चव्हाण हे शंकररावांचे पुत्र. शंकररावांनी आपला राजकीय वारसा अशोक चव्हाण यांना दिला. घरातच राजकारण असल्याने अशोक छक्केपंजे ठावूक होते. वडिलांकडूनच राजकारणाचे बाळकडू मिळालं. आपल्या वडिलांप्रमाणे अशोकरावही 2 वेळा मुख्यमंत्री राहिले.
मुंबईवर 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यामुळे त्तकालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. इथे अशोकरावांना लॉटरी लागली. पक्षश्रेष्टींनी मुख्यमंत्रिपदाची माळ अशोकरावांच्या गळ्यात घातली. अशाप्रकारे राज्याच्या राजकारणात पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याची पहिलीच वेळ ठरली.
यानंतर अशोकरावांनी 7 नोव्हेंबर 2009 ला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावरुन अशोक चव्हाणांची काँग्रेसमध्ये असलेली वट पुन्हा स्पष्ट झाली. मात्र दुसऱ्या टर्ममध्ये अशोकरावांना आदर्श घोटाळा चांगलाच भोवला.
आदर्श सोसायटी ही कारगिल युद्धात हौतात्म्य आलेल्या वीरपत्नींसाठी आदर्श सोसायटीचं बांधकाम करण्यात आलं. मात्र अशोकरावांवर याच सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या आरोपांमुळे अशोक चव्हाण यांना
कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. अशोक चव्हाण या आरोपांमुळे बॅकफूटवरही गेले. या आदर्श घोटाळ्यामुळे अशोकरावांना 2010मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्यांना 2010मध्ये मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या उतरता काळ सुरु झाला. काही वर्षांनी देशासह राज्यात मोदी लाट पसरली. देशात मोदी लाट असूनही अशोकराव 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. राज्यात तेव्हा काँग्रेसचे राजीव सातव आणि अशोक चव्हाण असे 2 खासदारच निवडून आले.
यानंतर अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली. अवघ्या काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या मविआ सरकारमध्ये अशोक चव्हाण हे सार्वजिनक बांधकाम मंत्री होते.
श्रीजया हिचे शिक्षण एलएलबी, एलएलएम झाले आहे. यापूर्वी अशोक चव्हाण यांना राजकीय वारसाबाबत अनेकवेळा विचारणा होत होती. मात्र, त्यांनी यावर थेट भाष्य केले नव्हते. आता मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त श्रीजया यांच्या राजकीय पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. नांदडे जिल्हाभर लावलेल्या बॅनरवरुन आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे, अशी चर्चा रंगली आहे.