आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले?

Maharashtra Politics राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार

Updated: Nov 4, 2022, 04:09 PM IST
आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले? title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 12 आमदार फुटले आहेत आणि सोलापुरात (Solapur) मोठ्या नेत्याचा दणका बाकी आहेस जरा थांबा... असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे (Shinde Group) सांगोल्याचे (Sangola) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे. जेवण वाढून ठेवलंय, फक्त जेवायचं बाकी आहे, राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार असा टोलाही शहाजीबापूंनी लगावलाय. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Government) कोसळणार नाही कारण 170 आमदार सरकारमागे भक्कम उभे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

सरकार कार्यकाळ पूर्ण करणार?
शिंदे फडणवीस सरकारची काळजी करु नका, सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही शहाजी बापू-पाटील यांनी म्हटलंय. तर सरकार पडण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दाव्याची सत्ताधारी शिंदे गटानं जोरदार खिल्ली उडवलीय. मुंगेरीलाल हे हसीन सपने, अशा शब्दांत कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी (Abdul Sattar) निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Political News : 'शिंदे सरकार पडणार...', अजित पवार पाहा काय म्हणाले?

शिंदे-फडणवीस सरकार पडणार?
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वर्तवलं होतं. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनानंतर शिंदे सरकार पडणार असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.  राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार 16 आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असे बोलले जात होते. मात्र, आता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केले आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असे ते म्हणाले. तर 145 चा आकडा कमी झाला की सरकार पडणार, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.