CONFIRM : आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाची तारीख झाली पक्की...

देशातील सर्वात अमीर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आकाशच्या मुलाची लग्नाची तारीख ठरली आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 26, 2018, 01:23 PM IST
CONFIRM : आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाची तारीख झाली पक्की...  title=

मुंबई : देशातील सर्वात अमीर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आकाशच्या मुलाची लग्नाची तारीख ठरली आहे. 

रसेल मेहताची मुलगी श्लोक मेहता हिच्यासोबत हा विवाह ठरला आहे. पीटीआयने या बातमीची खातरजमा केली आहे. गोव्यात झालेल्या प्री एंगेजमेंट सेरेमनीनंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे लग्न या वर्षाच्या अखेरीपर्यंत होऊ शकते. 

मात्र आता आलेल्या माहितीनुसार, त्यांच लग्न डिसेंबरमध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. अद्याप मेहता किंवा अंबानी कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जवळच्या व्यक्तींच अस म्हणणं आहे की, कुटुंबीय स्वतः याची घोषणा करणार आहेत. 

होळीच्या अगोदरच ठरली होती प्री - एंगेजमेंट सेरेमनी 

मिंटने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबीय आणि अगदी जवळच्या माणसांसोबत गोव्यात एका फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये शनिवारी औपचारिक एंगेजमेंटच्या अगोदर एक भेट झाली आहे. दोन्ही कुंटुबीय लग्नाबाबत चर्चा करत आहेत. मात्र गोवा इव्हेंटचा प्लान हा होळीच्या अगोदरच ठरला होता. 

या दिवसांमध्ये होऊ शकतो शाही सोहळा 

आकाश अंबानी आणि श्लोका यांच लग्न डिसेंबरच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये होणार आहे. त्यांचा हा शाही विवाह सोहळा 4 ते 5 दिवस चालणार आहे. असं म्हटलं जातं की हे लग्न 8 ते 12 डिसेंबरच्या दरम्यान मुंबईतील ऑबेरॉय हॉटेलमध्ये होणार आहे. मात्र अद्याप या दोन्ही कुटुबियांनी कोणतीच माहिती दिलेली नाही.