चैत्यभूमीवर ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांचा राडा; पोलिसांचीही तत्काळ कारवाई

ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दीपक केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चैत्यभूमीकडे जाऊ न दिल्याने त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

Updated: Dec 6, 2021, 02:28 PM IST
चैत्यभूमीवर ऑल इंडिया पँथरच्या कार्यकर्त्यांचा राडा; पोलिसांचीही तत्काळ कारवाई

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन असून असंख्य जण दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास येत आहेत. दरम्यान, ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दीपक केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना चैत्यभूमीकडे जाऊ न दिल्याने त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. ॉ

थोडा वेळ वातावरण तंग झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

या घटनेमुळे काही काळ चैत्यभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

दुपारी 1 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.