मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा या वर्षीचा पगार वाढलेला नाही. मात्र, दोन दिवसांत त्यांच्या संपत्तीत ९४०० कोटींची वाढ झाली की ते जगातील अनेक अब्जाधीशांना मागे टाकले. त्यांनी जागतिक पातळीवर अनोखा विक्रम केलाय. जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी १५ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी वॉलमार्टच्या जिम वॉल्टन आणि रॉब वॉल्टॉन यांना मागे टाकत त्यांनी हा विक्रम नोंदवला आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या निर्देशांकनुसार त्यांच्या मालमत्तेत मोठी वाढ झालेय. मुकेश अंबानी हे अलीबाबाचे जॅक मा यांच्या मागे आहेत.
१९ जून रोजी ब्लूमबर्ग इंडेक्सच्या मते, अंबानींची एकूण संपत्ती २.७५ लाख कोटी रुपये होती. १४ व्या स्थानी असलेल्या जॅक माच्या एकूण संपत्तीमध्ये ३.११ लाख कोटींची वाढ झाली. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडियाच्या शेअर्सची एकूण संपत्ती दोन दिवसांत ९४०० कोटींनी वाढली. त्यामुळे २१ जून रोजी त्यांची एकूण संपती ४१.९ अब्ज (२.८४ लाख कोटी) गेली आणि श्रीमंत लोकांच्या यादीत १५ स्थानावर आले आहेत.
या अहवालात मुकेश अंबानी आपल्या मालमत्तेतून ५६.६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल विकत घेऊ शकतात. ते १० दशलक्ष ग्रॅम सोने विकत घेऊ शकतात. अमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांची एकूण संपत्ती१४४.८ अब्ज डॉलर्स आहे. मायक्रोसाफ्ट कॉर्प. सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याकडे९२.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. ३४ वर्षीय मार्क जुकरबर्ग मालमत्तेच्या दृष्टीने सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफेटपेक्षा पुढे जातील अशी अपेक्षा आहे.
यावर्षी झकरबर्ग यांची संपत्ती ८.८ अब्ज डॉलर्सने वाढली आहे आणि त्यांची संपत्ती ८१.६ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. सध्या वॉरन बफेटची मालमत्ता ८१.६ अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये ५०० श्रीमंत लोकांचा यादीत समावेश केला जातो. ही यादी दररोज अपडेट केली जाते.