अमित शहा 'धक धक गर्ल' माधुरीच्या भेटीला...

अमित शाह आज मुंबईत दाखल झाले. 

Updated: Jun 6, 2018, 02:02 PM IST

मुंबई : अमित शाह आज मुंबईत दाखल झाले. या मुंबई दौऱ्यादरम्यान ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहत. या भेटीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी सेना-भाजप युतीची चर्चा होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 

'संपर्क फॉर समर्थन

'संपर्क फॉर समर्थन' अशी मोहीम भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमित शाह उद्या मुंबईतील विविध प्रसिद्ध व्यक्तींना भेटणार आहेत. या व्यक्तींमध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योजक रतन टाटा, गायिका लता मंगेशकर यांची भेट घेणार आहे.

घेतली माधुरीची भेट

धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या घरी दाखल झाले. रंगशारदेतील बैठक आटपून अमित शहा माधुरीच्या निवासस्थानी पोहचले. 

उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे लक्ष

संध्याकाळी उद्धव ठाकरेंसोबत होणाऱ्या अमित शहांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.