मुंबई: गेल्यावर्षी राजभवनावर भल्या पहाटे पार पडलेल्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह होते, असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या शपथविधीविषयी भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र, आम्ही अर्ध्या रात्री फोन करायची वेळ आली की आम्हाला अमित शहाच आठवतात. गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत शपथ घेण्यापूर्वी आम्ही अमित शाह यांना मध्यरात्री फोन करुन सर्व कल्पना दिली होती. यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडल्या. त्यामुळे या शपथविधीचे खरे शिल्पकार अमित शाह हेच होते, असे फडणवीस यांनी सांगितले.
'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी 'मिरची हवन' केलं होतं'
मात्र, अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन घेण्याचा निर्णय तितकासा योग्य नव्हता, अशी कबुलीही यावेळी फडणवीस यांनी दिली. आज मागे वळून पाहताना तो निर्णय घेतला नसता तरी चाललं असतं, असे वाटते. मात्र, त्यावेळी मला तो निर्णय योग्य वाटला. सगळेच पाठीत खंजीर खुपसत असताना राजकारणात जिवंत राहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, असे फडणवीस यांनी सांगितले.
शरद पवार आणि राऊतांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर रचला होता भाजपला धक्का द्यायचा प्लॅन
'ट्रोलिंगसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने फेक अकाऊंट तयार केलेत'
फेक अकाऊंटच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक ट्विट किंवा पोस्टवर जाणीवपूर्वक गचाळ भाषेत आणि द्वेषात्मक कमेंट केल्या जात आहेत. वैचारिक पातळीवर चर्चा असेल, खरं अकाऊंट असेल तर आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. मात्र, फेक अकाऊंद्वारे गलिच्छ भाषेत टिप्पणी करणे योग्य नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. सोशल मीडियावर सध्या जवळपास दीड लाख फेक अकाऊंट आहेत. यापैकी अनेक अकाऊंट शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून तयार करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.