मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज यांची मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी, भाजपच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं महाराष्ट्रासाठी केलेल्या कामांची यादीच अमित शाह यांनी यावेळी वाचली.
या आधीच्या सरकारनं ५० वर्षांच्या कार्यकाळात क्वचितच कामं केले असतील ते मोदी सरकारनं ३ वर्षांत करून दाखवलेत
या सरकारनं गरीब, युवक, दलित, महिला, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजना बनवल्या... आणि तळागाळापर्यंत पोहचवल्या
तीन वर्षांत आमचे विरोधीही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकले नाहीत
भारताच्या अर्थव्यवस्थेला वेग आणि दिशा दिली
देशात एकही असा गरीब उरला नाही ज्याचं बँकेत अकाऊंट नाही, याचा आम्हाला आनंद आहे
देशात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या
जीएसटी लागू करण्याची ना कुणाची इच्छा होती ना कुणाची हिंमत
जीएसटीला मूर्त रुप देण्याचं काम मोदी सरकारनं केलं
बेनामी संपत्तीविरुद्ध कडक कायदा करून काळा पैसा बाळगणाऱ्यांवर कारवाई केली
देशाच्या राजकारणातून जातीवाद, परिवारवाद नष्ट करण्यात भाजपला यश - अमित शाह
भाजप एक संवेदनशील सरकार - अमित शाह
नोकरी आणि रोजगारात खूप मोठा फरक असतो... मोदी सरकारनं साडे सात हजार नवे रोजगार निर्माण केले - अमित शाह