मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपकडून करण्यात आला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीदेखील या वादात उडी घेतली होती.यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'जिनके घर शीशेके बने होते है.. वो दुसरो पे पत्थर नही फेका करते' असे ट्विट करून भाजपला इशारा दिला होता.
नारायण राणेंकडून मिसेस फडणवीसांची पाठराखण; वरुण सरदेसाईंना दिला इशारा
राज कुमार का एक डायलॉग आज मुझे बहोत याद आ रहा है......
"चिनाय सेठ...,
जिनके घर शीशेके बने होते है..वो दुसरो पे पत्थर नही फेका करते.."
समझने वालोंको इशारा काफी है!!!!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) August 3, 2020
या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून अमृता फडणवीस यांच्याकडून आणखी एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये अमृता फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्यावर सणसणीत पलटवार केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील शाब्दिक युद्ध आता आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.
रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते हैं !
मगर हम तो वो शक़्स हैं, जो पत्थरों से घर बनाया करते हैं !
भूल गए हैं वो कांच के घरो में रहकर ख़ुद, छुपाएं कुछ छुपता नहीं !
हम फरेबियोंको ठोकरों में,और सच को सीने से लगाया करते हैं !#JaiShreeRam #JusticeForSushant #Disha— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 4, 2020
अखेर अनेकांच्या नाकावर टिच्चून राम मंदिर उभारले जातेय- देवेंद्र फडणवीस
भाजप नेते नारायण राणे यांनीही मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत सुशांत सिंह मृत्यूप्रकरणावरून शिवसेनेला धारेवर धरले होते. तसेच अमृता फडणवीस यांच्यावर टीका करणारे युवासेनेतील नेते वरुण सरदेसाई यांनाही नारायण राणे यांनी समज दिली होती. तू लहान आहेस, अन्यथा तुझे तोंड कसे बंद करायचे, हे आम्हाला चांगल्याप्रकारे ठाऊक असल्याचे सांगत नारायण राणेंनी मिसेस फडणवीसांची पाठराखण केली होती.