'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है...' Amruta Fadnavis यांचं ट्विट

अमृता यांचा राजकारणाशी संबंध नसला तरी त्यांचे ट्विट मात्र तुफान व्हायरल होत असतात.  

Updated: Apr 10, 2021, 07:30 PM IST
'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है...' Amruta Fadnavis यांचं ट्विट

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. शिवाय राजकीय, सामाजिक इत्यादी मुद्द्यांवर आपलं मत मांडून चर्चेत असतात. त्यांचा राजकारणाशी संबंध नसला तरी त्यांचे ट्विट मात्र तुफान व्हायरल होत असतात. आता देखील त्यांनी एक ट्विट केलं असून ट्विट जोरदार चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांवी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक चेहऱ्याला केक लावलेला फोटो पोस्ट केला आहे. 

फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है...' असं लिहीलं आहे. अशा आशयाचं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. अमृता यांनी पोस्ट केलेला फोटो त्याच्या वाढदिवसाचा आहे. 9 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस होता. 

अमृता फडणवीस यांनी वाढदिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असला तरी दिलेल्या कॅप्शनची चर्चा मात्र जोरदार होच आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. आता कोणत्याही क्षणी राज्यात लॉकडाऊन लागण्याची परिस्थिती आहे.