मोठी बातमी! बँकेच्या माजी मॅनेजरनेच टाकला दरोडा, महिला कर्मचाऱ्याची केली हत्या

विरारमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली असून एका आरोपीला पकडण्यात यश आलं आहे

Updated: Jul 29, 2021, 11:10 PM IST
मोठी बातमी! बँकेच्या माजी मॅनेजरनेच टाकला दरोडा, महिला कर्मचाऱ्याची केली हत्या

विरार : विरारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी मॅनेजरनेच बँकेत सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. विरार पूर्वमधल्या स्टेशन परिसरात असणाऱ्या ICICI बँकेतील ही घटना आहे. दरोडा घालताना अडवल्यानं या माजी मॅनेजरने महिला कर्मचाऱ्याची हत्या केली. हल्ल्यात आणखी एक महिला कर्मचारी जखमी झालीय. जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

बँकेतलं सोनं आणि रोख रक्कम लुटून नेण्याचा दोन आरोपींनी प्रयत्न केला. यात बँकेच्या एक माजी मॅनेजरचा समावेश आहे. दरोडा घालून पळण्याचा प्रयत्न करताना एका आरोपीला सतर्क नागरिकांनी पकडलं. आरोपीच्या हातातील सोनं आणि पैशाची बॅगही ताब्यात घेऊन नागरिकांनी आरोपी आणि बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. 

विरार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मॅनेजरविरुद्ध हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.