मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात, महिला ड्रग्स सप्लायरला अटक

10 ऑक्टोबर रोजी देखील तीन लोकांना केलं होतं अटक 

Updated: Oct 20, 2021, 11:11 AM IST
मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात, महिला ड्रग्स सप्लायरला अटक title=

मुंबई : आर्यन कान ड्रग्स प्रकरण ताजं असताना मुंबईतून मोठ्या प्रमाणात ड्रग्स ताब्यात घेतले आहेत. मुंबईतील सायनमधून 21 कोटींचं 7 किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे मुंबई ड्रग्स माफियांचा अड्डा बनत चालल्याची चर्चा होत आहे. 

मुंबई क्राईम ब्रांचच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ससोबतच एका महिला ड्रग्स सप्लायरला अटक केली आहे. मुंबईसह राजस्थानमध्ये अमली पदार्थाचं मोठं रॅकेट असल्याचं उघड झालं आहे. आर्यन खान प्रकरणासोबतच आता हा ड्रग्सचा साठा चर्चेत आला आहे. 

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सुनावणी

 क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood Actor Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला आज जामीन मिळणार की नाही? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज जर आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर त्याच्या कोठडीत आणखी वाढ होईल. दरम्यान एनसीबीने आर्यनचे व्हाट्स ऍप चॅन न्यायालयात सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. 

एएनआयने एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये पोलिसांना ड्रगशी संबंधित व्हॉट्सऍप चॅट सापडले आहेत जे आर्यन खान आणि डेब्यू अभिनेत्री दरम्यान असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ट्विटमध्ये उल्लेख केलेल्या अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.