'तुमचा दाभोलकर करु...' अंनिसचे श्याम मानव यांना धमकीचा फोन

धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना धमक्यांचं सत्र, श्याम मानव यांच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ

Updated: Jan 23, 2023, 04:21 PM IST
'तुमचा दाभोलकर करु...' अंनिसचे श्याम मानव यांना धमकीचा फोन title=

Shyam Manav : आताची मोठी बातमी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव (Shyam Manav) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) देण्यात आली आहे.  तुमचा दाभोलकर करु अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. धमकीनंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हा धमकीचा फोन आला. इतकंच नाही तर तुम्हाला जीवे मारू असा मेसेजही पाठवण्यात आला आहे. धीरेंद्र महाराज (Dhirendra Maharaj) यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना धमक्यांचं सत्र सुरु झालं आहे. 

श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ
श्याम मानव यांनी  धीरेंद्र महाराज उर्फ बागेश्वर बाबांना आव्हान दिलं होतं.  या आव्हानानंतरच धमक्यांचं सत्र सुरु झाल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्र स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या दोन जवनांबरोबरच आात दोन शस्त्रधारी जवान आणि तीन पोलीस श्याम मानव यांच्या सुरक्षेत असणार आहेत. नुकताच श्याम मानव यांच्या एका कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घातला होता. 

धीरेंद्र शास्त्री यांना आव्हान
अंनिसच्या श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज उर्फ बागेश्वर बाबांना दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. ते सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही श्याम मानव यांनी केली होती. धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' भरवतात. पण यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

धीरेंद्र महाराज यांनी नागपूरात यावं, नागपुरातील अशा पाच लोकांना आम्ही निवडू जे  तजस्थ आहत, यात निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश असेल. महाराजांनी या माणसांची नावं, वय, वडिलांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगायचा, असं आव्हान श्याम मानव यांनी दिलं होतं. तसंच धीरेंद्र महाराज यांना दोन संधी देऊ यात त्यांनी 90 टक्के माहिती बरोबर सांगितली तरी महाराजांच्या डोक्यावर पाय ठेऊन माफी मागे, तसंच हजारो बाबा, मांत्रिक आणि ज्योषितांचं भांडाफोड करणारी गेली 40 वर्ष सुरु असलेली आमची संस्था बंद करु असंही श्याम मानव यांनी म्हटलं होतं. 

श्याम मानव यांची भूमिका
धमक्या माझासाठी नवीन नाही, माझा विरोध धर्माला नसून धर्माचा नावावर और असलेल्या लुबाडणुकीला आहे, असं धमकीनंतर श्याम मानव यांनी म्हटलं आहे.  पुरोगामी विचाराचे दाभोळकर यांच्या हत्येनंतर मी माझा बोनस आयुष्य जगत आहे. त्यामुळे धमकीचा विरोधात मागील 40 वर्षांपासून काम करत असल्याने धमकी आली त्यात काही नवीन नाही. मी धर्माचा विरोधात नाही तर लुबाडणुकीच्या विरोधात आहे. मला आलेल्या धमक्यामुळे पोलिसानी गांभीर्य घेत सुरक्षा वाढवली असल्याचं अखिल भारतीय संघटनेचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

धिरेंद्र महाराज यांच्यात खरंच दिव्य शक्ती असेल तर त्यांनी नागपुरता येऊन आव्हान स्वीकारत सिद्ध करावे. यात नागपूर हे आंबेडकर आणि संघ अश्या दोन्ही संघटनानांचे शहर, गृहमंत्री यांचं शहर आहे, त्यामुळे आव्हानांची प्रक्रिया शांततेत पार पडू शकते. यासाठीच धिरेंद्र महाराज यांनी नागपुरात यावे असे आवाहन श्याम मानव यांनी केलेत. नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कायदा बंद करण्याच्या मागणीमागे पोलिसांनी तपास केल्यास संनातन संघटना असल्याचं आरोपही श्याम मानव यांनी केला आहे, 

शंकऱ्याचार्य यांनी म्हटलं की नसर्गिक आपत्तीची माहिती धिरेंद्र महाराज यांनी द्यावी, त्याच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धिरेंद्र महाराज यांच्या दिव्य शक्तीचा उपयोग देशाच्या सुरक्षेसाठी घ्यावा, त्यांना ताब्यात घेऊन देशात होणाऱ्या आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी व्हावा असेही ते म्हणालेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम
1989 मध्ये अंधश्रद्धा निर्मूल समितीची स्थापना झाली. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांनी या संस्थेची स्थापना केली होती. 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या बाबा, मांत्रिकांविरोधात ही संस्था काम करते.