NCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप

Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. 

Updated: Oct 26, 2021, 11:53 AM IST
NCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीची (NCB) कारवाई फर्जीवाडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. नवाब मलिकांनी एनसीबीवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्याचवेळी त्यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. बनावट जात प्रमाणपत्र आणि पैसे वसुलीचा आरोप त्यांच्यावर मलिक यांनी केला आहे.  दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी वानखेडे दिल्लीत गेल्याची माहिती समोर येत आहे. 

 आर्यन याच्याकडून हे नवीन वकील युक्तिवाद करणार 

सोमवारी आणखी काही आरोप केले. वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोट्यातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला.  

मलिक यांनी नवे प्रश्न उपस्थित करत एनसीबी आणि भाजपवर तोफ डागली आहे. दरम्यान NCB च्या अज्ञात अधिकाऱ्याकडून नवाब मलिक यांना पत्र प्राप्त झाले आहे. याचा लवकरच खुलासा देखील करण्यात येणार असल्याचे मलिकांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे. दरम्यान मलिकांनी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे दाऊद उल्लेख असलेला फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर देखील शेअर केला आहे. 

मात्र, समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी आणखी एक छायाचित्र ट्विट करुन वानखेडे आता चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका फेसबुकचा प्रोफाईल पिक्चर शेअर केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे छायाचित्र दिसत आहे. मात्र, या प्रोफाईलवर वानखेडे दाऊद असे नाव लिहले आहे. त्यामुळे ज्ञानदेव वानखेडे की दाऊद वानखेडे या संभ्रमात आणखीनच भार पडली आहे.

एनसीबी आणि खासकरून समीर वानखेडे यांच्या बद्दल बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आमची लढाई एनसीबी सोबत नाही गेल्या 35 वर्षात एनसीबीने मुंबईत देशात चांगलं काम केले आहे. पण आमची लढाई फर्जी समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. हा हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. भाजपने असे प्रश्न उपस्थित केले आहेत. मी धर्माला घेऊन कधी राजकारण करत नाही, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचवेळी ते म्हणाले, दलित मागासवर्गीय असल्याचे खोटे जात प्रमाणपत्र समीर वानखेडे यांनी बनवले. आणि एका मागासवर्गीयाचा हक्क हिरावला. मी काल समोर आणलेले सर्टिफिकेट खरं आहे. मी माझ्या शब्दावर ठाम आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

अनेक दलित संघटना दलित कार्यकर्ते माझ्यासोबत बोलत आहेत समीर वानखेडेच्या बोगस सर्टिफिकेट बद्दल. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सर्टिफिकेट खोटं ठरल्यास पाच ते सात वर्षांची कैद होऊ शकते. तसेच मला निनावी एक पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्याने पाठवले आहे. या पत्रात 26 प्रकरणाचा उल्लेख केला आहे. एनसीबीच्या फर्जी प्रकरण आणि पैसे वसुलीची माहिती या पत्रात आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.