मुंबई : ही बातमी आहे नव्या रंगांची..... मुंबईतलं एक गाव रंगीबेरंगी झालंय..... त्यामुळे या गावाचं नशीबच पालटलंय.....गेली कित्येक वर्षं इथं कुणी फिरकायचंही नाही.... पण आता हे गाव नव्या रंगांसह गजबजलेलं असतं.....
मुंबईत मेट्रोतून प्रवास करत असाल तर हे रंगीबेरंगी गाव दिसतं..... या गावाचं नाव असल्फा.... इतके दिवस टेकडीवर वसलेली एक झोपडपट्टी म्हणून फारसं कुणाचं लक्षही गेलं नाही.... पण आता मात्र टेकडीवरचं हे रंगीबेरंगी गाव उठून दिसतंय..... असल्फा गाव म्हणजे मुंबईच्या साकीनाक्याजवळ असलेल्या टेकडीवरच्या बैठ्या चाळी..... इतकी वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या बैठ्या चाळी अचानक रंगीबेरंगी प्रकाशात आल्यानं तिथं बरेच पाहुणे येतात..... गेल्या पंधरा दिवसांपासून कुणी इथे भिंती रंगवताना दिसतं, तर कुणी फोटो काढताना दिसतं.... मेट्रोतून दिसणा-या या चाळींना वेगवेगळे रंग दिले कर त्या उठून दिसतील, म्हणून काही तरुण तरुणी एकत्र आले आणि त्यातूनच साकारली चल रंग दे ही मोहीम..... त्यांनी या झोपड्यांच्या भिंती रंगवायला सुरुवात केली. साडे सातशे तरुण या कामाला लागले आणि पंधरा दिवसांत पावणे दोनशे भिंती रंगवल्या...... मुंबईची संस्कृती, भारतीय सण, लहान मुलांच्या आवडीची कार्टून्स असं सगळं काही इथे पाहायला मिळतं.
इथल्या पावणे दोनशे भिंती रंगवण्यासाठी 425 लीटर रंग लागला.... कुणी शिडीवर चढून भिंती रंगवत होता, तर कुणी चाळीच्या पत्र्यावर बसून चित्र काढत होता. पहाटे पाच वाजताच या रंगकामाला सुरुवात व्हायची.... दिवस मावळेपर्यंत रंग दिला जायचा..... पाच दिवसांत इथला नूरच पालटला...... या वस्तीत तसं कुणी यायचं नाही.... आता बरेच पाहुणे येतात, इथल्या लोकांशी बोलतात.... फोटो काढतात..... घरं रंगीबेरंगी झाल्यानं इथले रहिवासीही खूष आहेत.... घराजवळच्या या कलात्मकतेनं सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचं रहिवाशांचं म्हणणंय. या रंगकामात स्थानिकांनीही मदत केली....
रंगवलेल्या प्रत्येक भिंतीवर वेगवेगळी चित्रं साकारलीयत.... या असल्फा गावात मांजरींचं प्रमाण जास्त आहे... त्यामुळे मुद्दामून इथल्या भिंतींवर मांजरी काढण्यात आल्यायत... इथल्या अनेक घरात जोड व्यवसाय म्हणून महिला काही वस्तू तयार करतात... त्याचंही चित्रण भिंतीवर दिसतं..... मुंबईतल्या अशा आणखी चाळींना रंगवणार असल्याचं चल रंग दे संस्थेनं सांगितलंय....