मुंबई : आज आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन रस्ते, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं.
या टर्मिनलमुळे देशातील 80 टक्के क्रूझ प्रवासी वाहतूक मुंबईतून होणार आहे. वर्षाला 7 लाख प्रवासी वाहतूक नवीन क्रूझ टर्मिनलमधून अपेक्षित आहे. यामुळे देशाच्या महसूलमध्ये वाढ होईलच. पण मुंबई येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
नवीन क्रूझ टर्मिनलचा प्रकल्प येत्या 2 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. नवीन क्रूझ टर्मिनल हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळा प्रमाणे असणार आहे. तर 5 हजार प्रवासी वाहून नेणारे अतिभव्य क्रूझ इथे उभे राहू शकेल अशी या नवीन क्रूझ टर्मिनलची क्षमता असणार आहे.
पाहा व्हिडिओ