देशाला दोन पंतप्रधान पाहिजेत- प्रकाश आंबेडकर

 देशाचा गाडा हाकण्यासाठी दुसरा पंतप्रधान पाहिजे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला 

Updated: Oct 16, 2019, 12:03 PM IST
देशाला दोन पंतप्रधान पाहिजेत- प्रकाश आंबेडकर  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : या देशाला दोन पंतप्रधान पाहिजेत मोदी आंतरराष्ट्रीय पंतप्रधान आहेत आणि देशाचा गाडा हाकण्यासाठी दुसरा पंतप्रधान पाहिजे असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. ज्यादिवशी मनमोहन सिंग राफेलवर बोलतील त्या दिवशी पंतप्रधान मोदी स्वतःचे कपडे फाडतील असेही आंबेडकर म्हणाले. राहुल गांधींकडे हुकमाचा एक्का राफेल असताना दुरी तीरी ने का खेळत आहेत ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

एक कोटी नोकऱ्या निर्माण करणार अस सांगतायत. महाराष्ट्रात 2014 नंतर दोन लाख छोट्या मोठ्या कंपन्या बंद झाल्यात. आठ लाख लोकांना बेरोजगार केल आहे.अंबानी ग्रुप ला फायदा मिळावा म्हणून हे चालल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईतल्या 13 सीट वर मुस्लिम वंचित सोबत आले तर सेना बीजेपी त्या ठिकाणी जिंकू शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

महत्त्वाचे मुद्दे 

मुसलमानांनी ठरवावे ट्रिपल तलाक राज्यसभेत बिल न थांबवू शकणाऱ्या काँग्रेस एनसीपी बद्दल नीट विचार करा.

सेक्युलर वाद,मानवता वाद यावर वंचित चालतेय 

मॉब लिंचिंग थांबवायचे असेल तर सेना भाजपचे सरकार बनू देऊ नका. 

मोदी शरद पवारांची कोपर खळी काढतातय

हे सर्वसामान्यांचे सरकार नाही,उद्योगपतींचे सरकार.

मोदींनी 15 लाख देतो सांगून येड बनवलं 

आता खिशात आहेत ते पैसे काडून घेत आहेत

उधळलेल्या घोड्याचा लगाम हातात घ्यायचा आहे

मसणजोगी म्हणून लागले आहेत माझा लिंबूचा धंदा आता राजनाथ सिंग करू लागलेत

आता भाजपा आणि या पूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी ने पाट्या टाकल्या 

आमच्या अजेंड्यातल्या अनेक गोष्टी इतर राजकीय पक्षांनी कॉपी पेस्ट केल्या आहेत 

पाच वर्षात भाजपने दुष्काळी भागात पाणी का फिरवल नाही ? आम्ही अजेंड्यात घेतल्या नंतर भाजपने हा मुद्दा घेतला आहे 

केजी टू पीजी हा मुद्दा शिक्षणाची जबाबदारी सरकारची असली पाहिजे हा आपला मुद्दा राष्ट्रवादीने कॉपी केला

सत्ता हातात द्या घनकचऱ्यातून वीज निर्माण करू 

सत्ता दिल्यास आगरी,कोळी,भंडारी या मूळ मुंबईकरांच्या जमिनी त्यांच्या नावावर करणार

सरकारने ज्या कंपन्या सोबत एमओयू केले त्यातील एक ही कार्यरत झाली नाही