शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या मागे अॅड. गुणरत्न सदार्वेत यांचा हात असल्याचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप, पाह काय म्हटले  अॅड. गुणरत्न सदावर्ते 

Updated: Apr 8, 2022, 05:18 PM IST
शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया  title=

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांच्या घरावर संपकरी एसटी कामगारांच्या हल्ल्यामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि भाजपचा हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू सातत्याने न्यायालयात मांडणाऱ्या अॅड. सदावर्ते (adv gunratan sadavarte) यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.

एसटी संपाबाबत मी न्यायालयात युक्तीवाद करत असताना माझ्या कानावर ही बातमी आली, मी त्यांना थांबायला सांगितलं. मी व्हिडिओ पाहिला काही कष्टकरी महिला व्यथित झालेल्या दिसतायत, काही महिलांना चक्कर आलेली दिसतेय आणि खासदार सुप्रिया सुळे तिथे दिसताय, चर्चा करायची आहे असं त्या म्हणतायत, याआधी सुप्रिया सुळे यांनी या कष्टकऱ्यांना चर्चेसाठी कधी बोलावलं होतं. हे त्यांनी आधी स्पष्ट करावं, असं अॅड सदावर्ते यांनी म्हटलं. 

काल न्यायालयात या प्रकरणाचा युक्तीवाद झाला होता, आज निकाल लागणार होता, न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यात कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय दिले. पण महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खोटं सांगितलं, न्यायालयाने स्पष्ट सांगितलं आहे की विलीनीकरणाचा रिपोर्ट ही चॅलेंज झाला पाहिजे,  त्यानंतर पुढील आदेश होईल. न्यायालयाने एसटी कामगारांविरोधात निकाल दिला आहे असं गृहमंत्री बोलले, ते खोटं आहे. 

१२४ महिलांचं कुंकू फुसलं गेलेलं आहे. व्यथित झालेल्या त्या महिला आहेत. त्यांनी हल्ला केलाय असं म्हणू नका. जय श्री रामचा गजर कोण करत होतं माहित नाही, त्यांच्या अपरोक्ष कुणी काय केलं असेल तर मला माहित नाही. हल्लेखोर असते तर त्या व्यथित झाल्या नसत्या, असं अॅड सदावर्ते यांनी म्हटलंय.

कष्टकऱ्यांसाठी, १२४ विधवा झालेल्या भगिणींसाठी कोर्टात उभं राहणं म्हणजे हल्ल्यासाठी तयार करणं आहे. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करु नका असं आवानही अॅड. सदावर्ते यांनी केलं आहे.