Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही सर्वसामान्यांसाठी लाइफलाइन आहे. लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात. नेहमी गर्दीने तुंडूब भरलेल्या लोकलवरीव गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी रेल्वेकडूनही अनेक उपाययोजना करण्यतात येत आहे. मात्र, अद्यापही लोकलमधील गर्दी तसूभरही कमी झालेली नाहीये. कधी कधी लोकल वेळेवर आली नाही तरी संपूर्ण वेळापत्रक कोलमडते. बोरीवली-चर्चगेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. राम मंदिर- जोगेश्वरी दरम्यान एक ब्लॉक घेण्यात येत असल्याने याचा फटका काही लोकलला बसणार आहे.
6 मे आणि 7 मे दरम्यान राम मंदिर आणि जोगेश्वरी दरम्यान मेजर ब्लॉक घेण्यात येणार होता. (00:00 - 04:00 hrs) त्यामुळं धीमा लोकल अप मार्गावर वळवण्यात येणार आहे. गोरेगाव ते अंधेरीपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने तसे ट्विटदेखील केले आहे. तसंच, काही लोकला त्याचा फटकाही बसणार असल्याचे समजतंय.
BO91008 बोरीवली - चर्टगेट (Departs Borivali: 23:48 hrs, Arrives Churchgate: 00:53 hrs)
VR91012 विरार - चर्चगेट (Departs Virar: 23:20 hrs, Arrives Churchgate: 01:10 hrs)
BO91014 बोरीवली - चर्टगेट (Departs Borivali: 00:10 hrs, Arrives Churchgate: 01:15 hrs)
VR91016 विरार-अंधेरी (Departs Virar: 23:40 hrs, Arrives Andheri: 00:37 hrs)
VR91018 विरार-चर्चगेट (Departs Virar: 23:49 hrs, Arrives Churchgate: 01:26 hrs)
BO91020 बोरीवली-चर्चगेट (Departs Borivali: 00:30 hrs, Arrives Churchgate: 01:35 hrs)
BY91035 अंधेरी- भाईंदर (Departs Andheri: 00:46 hrs, Arrives Bhayander: 01:23 hrs)
दरम्यान, प्रवाशांनी लक्ष घ्या की, 91016 & 91035 अंधेरी प्लॅटफॉर्म क्रमांक 9वरील जलद मार्गावरुन धावतील. प्रवाशांना होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी आहोत, या बदललेल्या वेळेनुसार तुमच्या प्रवासाचे नियोजन करावे, असे अवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.
Attention Up line passengers traveling between Borivali & Churchgate (May 6th-7th 2024)⚠️
Due to a major block on the Up Slow line between Ram Mandir & Jogeshwari (00:00 - 04:00 hrs), Up Slow trains will be diverted to the Up Fast line from Goregaon to Andheri.
The following…
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) May 6, 2024
लोकलमधून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहेत. मुंब्रा रेतीबंदर पुलाच्या खाली पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर, कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एक तरुणी तोल जाऊन खाली पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला.