मुंबईतील ऑटोमोबाईल कंपनीला भीषण आग

 एका ऑटोमोबाईल कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Updated: Nov 18, 2021, 11:53 AM IST
मुंबईतील ऑटोमोबाईल कंपनीला भीषण आग title=

मुंबई : मुंबईतील पवई परिसरात आग लागली आहे. एका ऑटोमोबाईल कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. भीषण आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तासभर लागण्याची शक्यता आहे.