मनश्री पाठक, झी २४ तास मुंबई: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.. या हत्याकांडाने मुंबईच नाही तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. मात्र आता याच हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा करण्यात आलाय.. ज्या शूटर्सनी बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या केली, त्यांनी जो जबाब मुंबई पोलिसांना दिलाय त्यातून मोठा खुलासा समोर आलाय.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे त्यांचा मुलगा झिशानलाही मोठा धक्का बसलाय.. मात्र बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय... बाबा सिद्दीकींसोबतच त्यांचा मुलगा झिशानही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होता.. बाबा सिद्दीकींची हत्या करणा-या शूटर्सच्या चौकशीतून हा धक्कादायक खुलासा समोर आलाय.. मुंबई पोलिसांनाच या शूटर्सनी हा जबाब दिलाय..
बाबा आणि झिशान सिद्दीकी या दोघांना एकत्र मारण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. संधी न मिळाल्यास जो मिळेल त्याला मारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांना कोणत्यातरी आतल्या व्यक्तीने कॉल करुन सांगितलं की, दोघेही म्हणजे वडील आणि त्यांचा मुलगा इथेच आहेत.
आरोपी तिथे पोहोचले आणि ते सिद्दीकींची वाट बघत होते. मात्र झिशान परत ऑफिसमध्ये निघाले आणि बाबा सिद्दीकी त्यांच्यासमोर आले. दिलेल्या सुचनेनुसार दोघांपैकी कोणीही दिसलं तरी त्याला मारायचा आदेश होता असा जबाब या शूटर्सनी मुंबई पोलिसांना दिलाय..जेव्हा बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाला तेव्हा त्या हल्ल्यातून झिशान सिद्दीकी हे थोडक्यात बचावले होते..
झिशान आणि बाबा सिद्दिकी हे एकत्र सोबत घरी जाणार होते. मात्र गोळीबार होण्याच्या आधी झिशान सिद्दीकींना एक फोन आला. म्हणून ते परत ऑफिसमध्ये आले.. बाबा सिद्दीकी एकटेच ऑफिसबाहेर पडले आणि त्यांच्यावर शूटर्सनी गोळ्या झाडल्या..
गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप आणि शिवा या तीन आरोपींनी सिद्दीकींवर हल्ला केला.. तर चौथा आरोपी झिशान अख्तर हा तीनही आरोपींना हँडल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. हरियाणाच्या जेलमध्ये सिद्दीकींच्या हत्येचा कट शिजल्याचीही माहिती मिळतेय.. मात्र बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा कट आरोपींनी रचला होता. आरोपींच्या या जबाबामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.