मुंबई : Bail granted to Navneet Rana and Ravi Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा जामीन देताना त्यांना काही अटकी घालण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत होते. जामिनासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केल होता. या निकालावर वाचन पूर्ण न झाल्याने निकाल लांबला होता. आज सकाळी निकालावर निर्णय होऊन त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
- प्रत्येकाला 50 हजारांची रोख जामीन आणि तेवढ्याच किंमतीच्या एक जामीनदार द्यावा लागणार
- पुराव्यात कोणतीही छेडछाड करणार नाही
- असं काहीच करणार नाही जेणेकरुन तपास प्रभावित होणार
- राणा दाम्पत्य यांना मीडियासी बोलण्यावर बंदी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोरवर हनुमान चालिसा म्हणण्याआड मोठा कट होता. सरकार उलथवण्यासाठी स्थिती निर्माण करण्याचा हेतू, होता अशी बाजू मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात मांडली होती. मातोश्रीवर हनुमान चालिसा पढण्याआड कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा कट राणा दाम्पत्याने आखला होता, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले. एवढंच नाही तर याद्वारे महाविकास आघाडी सरकारच बरखास्त करण्याचा हेतू यात होता, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितले.