BBC Documentary Screening Row : गुजरातमधील दंगलीवर (Riots in Gujarat) आधारित बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून (BBC Documentary) देशातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. दिल्लीतील जेएनयू (JNU) आणि जामिया विद्यापीठात झालेल्या स्क्रीनिंगवरुन मोठा गदारोळ झालाय. अशातच आता मुंबईत देखील बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे पडसाद पहायला मिळत आहेत. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूटबाहेर (TISS) मोठा मोठा राडा झाल्याचं दिसतंय. (BBC documentary On Modi Screening Row in Tata Institute of Social Sciences mumbai marathi news)
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (Tata Institute of Social Sciences) म्हणजेच टीसमध्ये आज ही डॉक्यूमेंट्री दाखवली (BBC Documentary Screening Row) जाणार आहे. त्यावरून भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप युवा मोर्चाने डॉक्यूमेंट्री दाखवण्यावर आक्षेप घेतला. कोणत्याही परिस्थितीत ही डॉक्यूमेंट्री दाखवली जाऊ नये, असं भाजयुमोने म्हटलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधी मंडळ चर्चा करण्यासाठी टीसमध्ये जाणार आहेत.
आज संध्याकाळी साडेसात वाजता डॉक्यूमेंट्री दाखवण्यात येणार असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन (Protest by BJP) केलं. त्याचबरोबर पोलिसांचा (Mumbai Police) गराडा देखील वाढल्याचं पहायला मिळतंय. शिष्टमंडळ पदाधिकाऱ्यांशी आणि टीसचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जातंय.
आणखी वाचा - BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येणार आहेत. 10 फेब्रुवारीला बोहरी मुस्लिम समाजाचा कार्यक्रम आहे. मुंबईच्या मरोळमधील कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असतानाच आता बीबीसी डॉक्यूमेंट्रीचा वाद पेटला आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांचं देखील टेन्शन वाढलंय.