मुंबई : Amravati Violence : भाजपकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अमरावतीत हिंसक वळण लागले. (Amravati Band Violence) गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. दरम्यान, समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse - Patil) यांनी दिला आहे.
आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळे. नांदेड, नाशिक मालेगाव येथील परिस्थिती नियंत्रणात आली असताना अमरावतीत हिंसा भडकली आहे. येथील राजकमल चौकात भाजपसह अनेक संघटनांचे कार्यकर्ते जमल्यानंतर दगडफेक, तोडफोडीला सुरुवात झाली. राजकमल चौकात कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी दिल्या.
राज्यातल्या इतर भागात शांतता आहे. अमरावतीतही परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. अमरावतीतील सर्व प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्यातील इतर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून, अमरावतीतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. तर समाजात द्वेष पसरवणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला.
नांदेड, मालेगावातले वातावरण पूर्णपणे निवळले आहे. नांदेडमध्ये पोलिसांनी दंगलखोरांना अटक केली तर मालेगावात तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. दहा हुल्लडबाजांना अटक केली आहे.