मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवूनही कोरोनाच्या रूग्णांमध्ये घट झालेली नाही. अशा परिस्थितीत सरकारवर टीका होताना दिसत आहे. अशावेळी भाजप नेता निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री फेसबुक द्वारे संवाद साधत आहेत. यावरच निलेश राणेंनी टीका केली आहे.
आज ८ वाजता परत बाबा चुरणदास फेसबुक लाईव्ह करणार. लॉकडाऊन वाढवण्यापलीकडे काही करणार नाही. एकतर अर्धी मराठी अर्धी हिंदी मध्ये प्रवचन देणार, काही तालमेल नसतो. लोकांना कळलंय की हे राज्य ठाकरे वाकरे कोण चालवत नाही आहे ते राम भरोसे चाललंय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 8, 2020
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही १० हजाराच्या पार गेली आहे. कल्याण-डोबिंवलीतही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढली आहे. नव्याने कोरोनाबाधित 27 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे.
आज वाढलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिम 10, कल्याण पूर्व 6, डोंबिवली पश्चिम 4, डोंबिवली पूर्व 6, आंबिवली येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या 280 वर पोहोचली असून आतापर्यंत 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात काल २० कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. धक्कादायक म्हणजे एका दोन महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे.