भाजप ओबीसी मोर्चा समीर वानखेडेंच्या समर्थनात उतरणार रस्त्यावर

समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे उद्या मुंबईत निदर्शनं होणार आहेत.

Updated: Oct 28, 2021, 03:23 PM IST
भाजप ओबीसी मोर्चा समीर वानखेडेंच्या समर्थनात उतरणार रस्त्यावर title=

मुंबई : भाजप ओबीसी मोर्चा समीर वानखेडेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार आहे. समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ भाजपचे उद्या मुंबईत निदर्शनं होणार आहेत. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निदर्शनं होणार आहेत.

उद्या दुपारी 3 वाजता भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर समीर वानखेडे समर्थनार्थ भाजपचे आंदोलन होणार आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात कारवाईनंतर वादात सापडलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर विविध आरोप होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. यावरुन आता भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर समीर वानखेडे चर्चेत आले. नंतर त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. हे आरोप आता वैयक्तीक स्तरावर देखील पोहोचले आहे. 

दुसरीकडे किरण गोसावी यांच्या बॉडीगार्डनं एक व्हिडिओ जारी करून 8 कोटींची खंडणी घेतल्याचा आरोप केल्यानंतर समीर वानखेडे अधिक अडचणीत सापडलेत. त्यांच्यावर मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल करुन चौकशीचे आदेश ही दिले आहेत. त्यातच आता समीर वानखेडे यांची बदली होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे.