मुंबई : कोरोना संकटात यंदा सगळीकडे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला. राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत मुर्तीची उंची, मंडप, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत भक्तांनी बाप्पाचे दर्शन घेतले. गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगर पालिकेने नियमावली तयार केलीय. पालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी ४४५ विसर्जन स्थळे असून २३ हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई पालिका क्षेत्रात एकूण ४४५ विसर्जन स्थळे आहेत. सध्या कृत्रिम तलाव संख्या १६८ असून मूर्ती संकलन केंद्र १७० आहेत. मुंबईत ३७ फिरती विसर्जन स्थळे आहेत. ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत.
गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे
नैसर्गिक विसर्जन स्थळी उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे आपल्या मूर्ती विसर्जनासाठी द्यावी
कृत्रिम तलाव जवळ असलेल्या भाविकांनी त्याचा वापर करणे अनिवार्य
महापालिकेच्या संकेत स्थळावर संकलन केंद्र आणि तलावांची माहिती पत्ता तसेच गुगल लोकेशनसह पाहायला मिळेल.
प्रतिबंधित क्षेत्र आणि सील इमारतीत असणाऱ्या सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच किंवा संबंधित घरातच करावे
विसर्जनावेळी सोशल डिस्टन्सिंग मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक