जसलोकमधील बेड्स ताब्यात घेण्याबाबत पालिकेचा पुनर्विचार, 'हे' आहे कारण

पालिकेकडून रुग्णालयातील बेड्स ताब्यात घ्यायला सुरुवात

Updated: Apr 16, 2021, 10:09 AM IST
जसलोकमधील बेड्स ताब्यात घेण्याबाबत पालिकेचा पुनर्विचार, 'हे' आहे कारण title=

मुंबई : मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने रुग्णालयातील बेड्स ताब्यात घ्यायला सुरुवात केलीय. दरम्यान काही रुग्णालयात स्टाफच्या कमतरतेमुळे असं करणं शक्य नसल्याचं दिसतंय. जसलोक हॉस्पिटलनं बीएमसीकडे 250 बेड ताब्यात घेण्याविषयी पुर्नविचार करण्याबाबत विनंती केलीय.

जसलोक हॉस्पिटलमध्ये 30 कॅन्सर पेशंट आहेत तर काही पेशंट अनेक वर्षांपासून काही उपचार घेत असल्याचं हॉस्पिटलचे म्हणणं आहे. हॉस्पिटलच्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेकडून पुन्हा एकदा जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंट केले जातील. त्यानंतर नॉन कोविड पेशंटला इतरत्र हलवणे शक्य आहे का ? हे तपासले जाईल आणि नंतर बेड ताब्यात घेतले जातील.

मुंबईत बेडसची कमतरता पाहता महापालिकेने बेडस वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार मुंबईत 1780 बेडस् वाढणार आहेत. यांपैकी 70 आयसीयु बेडस् आणि जवळपास 1500 ऑक्सिजन बेड असणार आहेत. जसलोक हॉस्पिटलमध्ये एकूण 250 बेड हे डॅशबोर्डवर घेतले जातील असे पालिकेने म्हटले होते.  यात 40 आयसीयु बेड आहेत. मात्र, जसलोक हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेण्याचा आदेश मागे फिरवलेला नाही असे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितलेय. जसलोक हॉस्पिटलमधील बेड असेसमेंटनंतर कोविड पेशंटसाठी अंदाजे 135 ते 140 पर्यंत बेड ताब्यात घेतले जाऊ शकतात असे चहल म्हणाले.

जसलोकमध्ये सध्या 250 बेड मॅनेज करता येतील एवढा स्टाफ नाहीय.
सध्या जे कोविड वॉडात काम करतात त्यांची ड्युटी सक्तीने 6 तासावरुन वाढवून 8 तास केली जाणाराय अशी माहितीने सुत्रांनी दिलीय. इतर हॉस्पिटलमध्ये कोविड ड्युटी 6 तासच आहे. दरम्यान पीपीई किट घालून 6 तास काम करणं शक्य नाही, असं स्टाफचं म्हणणं आहे पण मॅनेजमेंट ऐकायला तयार नाही असेही वृत्त समोर येतंय.

किती बेड्स वाढवणार ?

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्येही 30 आयसीयु बेड वाढवण्यात येतील 

गोरेगांवच्या नेस्को जम्बो कोविड सेंटर येथे 1500 ऑक्सिजन बेड वाढवण्यात येतायत. मुंबईत कोरोना बेड्सचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेचं महत्वाचे पाऊल आहे.

बेडची कमतरता सोडवण्यासाठी हॉटेल्समधले बेडही कोरोना रुग्णांसाठी वापरले जाणार आहेत. खासगी रुग्णालयांसोबत फोर-फाईव्ह स्टार हॉटेल्सशी टायअप केला जाणार आहे. रिकव्हर होत असणारे आणि आयसीयु बेडची गरज नसणारे रुग्ण हॉटेल्समध्ये हलवले जाणार आहेत. अशा रुग्णांना हॉटेलमधील उपचारासाठी स्टेप डाऊन फॅसिलीटी दिली जाणार आहे.  

बॉम्बे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्टेपडाऊन फॅसिलीटीसाठी मरिन ड्राईव्ह येथील इंटर कॉन्टीनेंटर हॉटेल तसेच एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलसाठी बीकेसी येथील ट्रायडंड हॉटेल बुक करण्यात आले आहेत.