लव्ह, सेक्स और पैसा ... अखेर प्रेमाचा अंत असा वाईट झाला...

पोलिसंनी या तरुणीची ओळख इशिता कुंजुर म्हणून सांगितली, तर या तरुणाचे नाव बिपिन विनोद कंडुलना असे सांगितले.

Updated: Jun 2, 2021, 07:54 PM IST
लव्ह, सेक्स और पैसा ... अखेर प्रेमाचा अंत असा वाईट झाला... title=

मुंबई  :  प्रेम जितके चांगले तितके वाईट देखील. प्रेमात माणसाला काहीही करण्याचे बळ येते, त्यामुळे लोकं प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात. अगदी काहीही.... या संज्ञेला खरे माणून एक प्रेयसी आपल्या प्रियकराकडून काही जास्तच अपेक्षा करु लागली आणि मग या प्रियकराने त्याच्या प्रेयसीचे प्राण घेतले. बांद्राच्या एका मोठ्या सोसोयटीमध्ये ही घटना घडली. ज्यानंतर या प्रकरणाचे सगळे सुत्र क्राईम ब्रांच यूनीट 9 कडे गेले. त्यांना या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहचण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. त्यांनी लगेच या खूनाचा खरा आरोपी शोधला आणि ही केस बांद्रा पोलिसांकडे सोपवली.

पोलिसंनी या तरुणीची ओळख इशिता कुंजुर म्हणून सांगितली, तर या तरुणाचे नाव बिपिन विनोद कंडुलना असे सांगितले. इशिता बांद्राच्या सोसोयटींमध्ये घरं काम करायची तर, बिपिन येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करत असल्याची पोलिसांना महिती मिळाली.

त्यानंतर चौकशी दरम्यान बिपिनने पोलिसांकडे आपला गुन्हा मान्य केला. त्याने या घटनेबद्दल महिती देताना पोलिसांना सांगितले, रविवारी रात्री इशिता आणि तो त्याच्या घरी भेटले होते. त्या दरम्याने त्यांच्यात शारीरीक संबंधही झाले. त्यानंतर इशिताने त्याच्याजवळ दिड लाख रुपये मागितले.

त्यानंतर बिपिनने सांगितले की, त्याने जेव्हा इशिताला एवढे पैसे देण्याचे नाकार दिला तेव्हा, ती त्याला खोट्या रेपच्या जाळ्यात अडकवेल अशी धमका देऊ लागली. त्यानंतर बिपिनने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती त्याचे ऐकायला तयार नव्हती. त्यानंतर बिपिनने तिला शांत करुन बाहेर फिरायला नेले.

परंतु तेथे ही त्या दोघांमध्ये भांडण सुरु झाले आणि इशिता आरडाओरडा करु लागली. तिने स्वत:चे कपडे देखील फाडले. त्यांनतर बिपिन घाबरला आणि त्याने तिचा गळा पकडला. त्याने तिचा गळा इतक्या जोरात पकडला की, जागेवरच इशिताचा मृत्यू झाला. त्यानंतर घाबरून बिपिन तिथून पळून गेला.

सोमवार सकाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच. क्राइम ब्रांच युनिट 9 चे आधिकारी संजय खताले यांनी त्यांच्या टीमसह शोध सुरु केला. त्यानंतर त्यांनी सीसीटीवी फूटेज पाहिले असता, त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि 12 तासाच्या आत आरोपीला पकडले. आता या प्रकरणात पोलिस पुढील तपास करत आहे.