दिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.  दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.

Updated: Oct 17, 2017, 09:32 AM IST
दिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी,  जोरदार खरेदीकड कल title=

दीपाली जगताप-पाटील/ मुंबई : नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.  दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळी आली की महिलांची पावलं आपोआप सोन्याच्या दुकानाकडे वळतात. यंदा जीएसटीनंतर सराफा व्यापार मंदावला होता पण दिवाळीची चाहूल लागताच ग्राहकांनी जोरदार बुकिंग करायला सुरुवात केलीय. गुंतवणुकीच्या दृष्टीनंही सोनं खरेदी सध्या केली जातेय. धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज अशा सर्वच सणांसाठी सोनं खरेदीला प्राधान्य दिलं जातं. सोन्याच्या कॉईन्सची धनत्रयोदशीला खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. सध्या २९ हजाराच्या घरात सोन्याचा भाव सुरु असून दिवाळी संपेपर्यंत असाच दर राहणार असल्याची शक्यता आहे. 
 
दिवाळीच्या निमित्तानं सोन्याच्या दुकानांमध्येही आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. यंदाही सोन्याच्या दुकानात विविध ऑफर्स असून सोनं मेकिंगवर सूट, कॉईन्सवर सूट, डायमंड खरेदीवर कॉईन मोफत, १  लाखापर्यंतच्या खरेदीवर २ ग्रॅमचा कॉईन, १ लाख सोनं खरेदीवर एक पैठणी मोफत, १० हजार खरेदीवर कूपन अशा विविध ऑफर्स आहेत.  सोनं खरेदी करण्यासाठी महिलांना निमित्तच हवं असतं त्यात दिवाळी तर वर्षातला सर्वात मोठा सण, त्यामुळे शुभ मानून थोडं का होईना सोनं खरेदी आवर्जून केली जातेय.