मुंबई : बृहन्मुंबई महानगर महापालिकेने (BMC) ने दावा केला आहे की, देशात पहिला XE व्हेरिएंटचा रुग्ण मुंबईत आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या फॅशन डिजायनरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
कोरोना व्हायरसच्या नव्या XE strain बाबत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने आलं आहे. राज्य सरकारने बुधवारी देशात पहिल्या एक्सई स्ट्रेनच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती दिली होती. मुंबईत XE Verient चं पहिला रुग्ण आढळला आहे. पण केंद्र सरकार याला दुजोरा देण्यास तयार नाही. XE स्ट्रेन ओमायक्रॉनचं नवं रुप आहे. जो अधिक वेगाने पसरत असल्याचा इशारा WHO ने दिला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) दावा करते की, देशात कोरोनाच्या एक्सई स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दक्षिण आफ्रिका येथून आलेली 50 वर्षीय महिला मागच्या आठवड्यात पॉझिटिव्ह आली होती. चाचणी दरम्यान एक्सई स्ट्रेन मिळाल्याचा दावा केला गेला आहे. पण केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, चाचणीत चूक झाली आहे. ही महिला 27 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आली होती. महिलेचा स्वॅब मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.
एक्सई स्ट्रेन ओमायक्रॉनच्या बीए.1 आणि बीए.2 स्ट्रेनचं एकत्रित रुप आहे. हा ब्रिटेनमध्ये आढळला होता.
दक्षित आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या महिलेने दोन्ही डोस घेतले आहेत. पण तरी देखील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.