धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका

संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचे सिद्ध करा, नाहीतर माफी मागा 

Updated: Jul 12, 2020, 06:49 PM IST
धारावीच्या श्रेयवादाचा मुद्दा तापला; राष्ट्रवादीची चंद्रकांत पाटलांवर शेलक्या भाषेत टीका title=

मुंबई:  धारावी परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव Coroanvirus नियंत्रणात आणण्याचे श्रेय एकट्या राज्य सरकारला घेता येणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकत्यांनी आपला जीव धोक्यात टाकून धारावीत स्क्रीनिंग केले. त्यामुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात RSS चा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली आहे.

धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक

चंद्रकांत पाटील यांनी धारावीत संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याचे सिद्ध करुन दाखवावे. अन्यथा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली. नितीन देशमुख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, धारावीत संघाच्या स्वयंसेवकांनी प्रत्येक घरात जाऊन काम केल्याचे सिद्ध झाल्यास आम्ही चंद्रकांत पाटील साहेब यांना चंपा असे कधीच संबोधणार नाही, अशी जाहीर शपथ घेऊ, अशी बोचरी टीका देशमुख यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे. 

'भाजपने धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेणे म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची प्रवृत्ती'

तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही धारावीच्या मुद्द्यावरुन भाजपवर हल्ला चढवला होता. धारावी पॅटर्नच्या यशाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा प्रयत्न म्हणजे मढ्यावरचं लोणी खाण्याची निलाजरी प्रवृत्ती असल्याचे शेवाळे यांनी म्हटले. धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्यक्ष कोणी किती मेहनत घेतली, याची साक्ष धारावीतील जनताच देईल. मोठेपणा हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. उगीच नको त्या विषयात राजकारण करून जनतेच्या भावनांचा अनादर करणे विरोधकांना महागात पडेल. अशा कठीण प्रसंगात दिवसरात्र सरकारवर टीका करायची आणि चांगल्या कामगिरीच्या श्रेयासाठी रेटून खोटं बोलायचं, ही दुटप्पी भूमिका असल्याचे शेवाळे यांनी म्हटले.