मुंबई : सत्तासंघर्षाचा पेच सुटणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य संजय राऊत यांची शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून या सत्तासंघर्षाचा पेच सोडवतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत सध्या लीलावती रूग्णालयता उपचार घेत आहेत. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. छातीत दुखू लागल्याने काल ते उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाले होते.
शरद पवार लीलावतीत संजय राऊत यांना भेटल्यानंतर ते आता यशवंतराव चव्हाण सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदारांच्या बैठकीला निघाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आज रात्री साडेआठपर्यंतची वेळ राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी देण्यात आली आहे.