राज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र

  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला. 

Updated: Feb 5, 2018, 08:19 PM IST
 राज ठाकरेंचा भुजबळ छोडोचा कानमंत्र

मुंबई:  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 'आता भुजबळ छोडो चळवळीची गरज असल्याचा सल्ला ठाकरेंनी भुजबळ समर्थकांना दिला. 

पुढील वर्ष सहा महिन्यात सर्व काही सुरळीत होईल असा दिलासाही राज ठाकरे यांनी समर्थकांना दिला आहे. भुजबळांच्या अटकेबाबत राजकारण सुरु आहे. ते ना मी मांडू शकत ना तुम्ही मांडू शकत. कारण प्रकरण कोर्टात आहे. केस आर्थिक विषयांवरची आहे. त्यामुळे या प्रकरणात जामीन कधीच मिळायला हवा होता. सगळ्या गोष्टी सील केल्या असतील तर तुम्हाला काय इन्कवायरी करायची आहे ना ! तुम्हाला कस्टडीची गरज नाही. विषय एवढाच आहे.

तुमचं नाव चुकलंय जरा. भुजबळ जोडो अभियान चुकीचं आहे, भुजबळ छोडो हवं होतं. समर्थक जोडोनं काय होणार ?

सुडाचं राजकारण देधभर सुरू आहे. वर्ष-सहा महिने काढायचे आहेत.

भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी समर्थक सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यांनी आज सकाळी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट घेतली. 'आमचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही,' असे गाऱ्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले.

 त्यावर 'भुजबळ यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे', असे ठाकरे म्हणाले.