मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार

​Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत.  

Updated: Jul 8, 2022, 08:13 AM IST
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार  title=

मुंबई : Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आज संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत. शिंदे आणि फडणवीस दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील दिल्लीला जाणार आहेत. 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार चर्चा सुरू असताना हे तिन्ही महत्वाचे नेते दिल्लीला जाणार आहेत. तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते या नेत्यांशी चर्चा करतील. दिल्लीवरुन हिरवा सिग्नल मिळताच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं बोललं जाते आहे.

दरम्यान, 9 जुलै विस्तार करावा का याबाबत हालचाली पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच मत आहे की, 9 जुलै मंत्रीमंडळ विस्तार करावा तर काहीच मत आहे. 13 जुलै नंतर करावा, याबाबत फडणवीस दिल्लीत चर्चा करतील अस समजते.

तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा आज शपथविधी होणार आहे. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम होईल. यावेळी भाजपाचे प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे आज शपथ घेतील.