PRP-Shinde Group Alliance : जोगेंद्र कवाडेंसोबत शिंदे गटाची युती; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पावरफुल प्लान

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या(People Republican Party) जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांच्या सोबत शिंदे गटाने नव्या भीमशक्ती-शिवशक्तीची मोट बांधली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी करण्यात आली आहे. 

Updated: Jan 4, 2023, 05:15 PM IST
PRP-Shinde Group Alliance : जोगेंद्र कवाडेंसोबत शिंदे गटाची युती; ठाकरे-आंबेडकरांच्या युतीला शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पावरफुल प्लान title=

PRP-Shinde Group Alliance :  ठाकरे-आंबेडकर(Thackeray-Ambedkar) यांच्या भीमशक्ती-शिवशक्तीला(shivshskati-bhimshkati) शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी  पावरफुल प्लान आखला आहे.  पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या(People Republican Party) जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांच्या सोबत शिंदे गटाने नव्या भीमशक्ती-शिवशक्तीची मोट बांधली आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंवर आपला विश्वास आहे.  या आघाडीचा आनंद असल्याचं कवाडे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जोगेंद्र कवाडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली(PRP-Shinde Group Alliance ) . 

दलित पँथर आणि आता कवाडे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करणार 

आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गटाने कंबर कसली आहे.  दलित पँथर आणि आता कवाडे यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी ही युती केल्याची चर्चा आहे. यामुळं राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट आणि आता वंचित एकत्र आल्यामुळं मतांची विभागणी न होता, एकत्र मतं महाविकास आघाडीला मिळतील. तर दुसरीकेड भाजपा, शिंदे गट व दलित पत्थर यांची युती झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे तसेच मतांचे गणित बदलणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उद्धव ठाकरे जितक्या जागा सोडतील तितक्या जागा लढवणार - प्रकाश आंबेडकर

आगामी महापालिका निवडणुकीसाठी आपण शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. मुंबई महापालिकेत 83 जागांवर लढण्याची वंचितची तयारी होती. मात्र आता उद्धव ठाकरे जितक्या जागा सोडतील तितक्या आम्ही लढवू असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. 

ठाकरे गटासोबत आंबेडकर आल्यास परिवर्तनाची नांदी होईल असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायला तयार आहोत असं प्रकाश आंबेडकरांनी काल म्हटलं होतं. त्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान अनेक दिवस  ठाकरे-आंबेडकर यांच्या युतीची चर्चा रंगली होती. ठाकरे आंबडेकर यांच्यासह युती करण्यास उच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली नव्हती. यानंतर आता तेढ आंबेडक यांनी किती जागा लढवणार याचीच घोषणा केली आहे.