Uddhav Thackeray vs Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात आता दोन आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष आता टोकाला पोहोचलाय.
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर उद्दव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावलाय. आज त्यांनी सेनाभवनात महिला आघाडीतल्या प्रमुख महिला नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती त्याला ब्रेक नव्हता सुसाट सुटला होता, असे टोले उद्धव ठाकरेंनी मारले. एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं अपघात तर होणार नाही. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचलाय पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असं उद्दव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे, यात त्यांनी म्हटलं आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार! आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
देवेंद्र फडणवीस यांचंही उद्धव ठाकरेंना उत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली आहे. मोदींच्या या लाटेत सामान्य माणूसच राजा होईल, हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी समजून घ्यावं. ज्यांना असं वाटतं की तेच सत्ता चालवतील, त्यांनी समजून घ्यावं, असं फडणवीस म्हणालेत.
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणून हिणवलं, ज्याला चायवाला म्हणून हिणवलं त्यांच्यावर मोदींना पाणी पिण्याची वेळ आणली, आज त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे, हे तुम्ही पाहाताय, आम्ही रिक्षावाले असू तर आम्हाला अभिमान आहे, पान टपरी, चहा टपरीवाले असू, रस्त्यावरील विक्रेते असू आम्हाला अभिमान आहे, कारण या देशात तो स्वाभिमानाने जगतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.