माझे आहे ते चांगले आहे, 'मातोश्री'चा आशीर्वाद माझ्या पाठिशी - उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारी निवासस्थान 'वर्षा'वर जाणार का?

Updated: Mar 7, 2020, 04:35 PM IST
माझे आहे ते चांगले आहे, 'मातोश्री'चा आशीर्वाद माझ्या पाठिशी - उद्धव ठाकरे title=

अयोध्या : माझे आहे ते चांगले आहे. आपण म्हणतो ना, कायम आईचे आशीर्वाद असतात. तसे माझ्या पाठिशी 'मातोश्री'चे आशीर्वाद राहिले आहे. त्यामुळे 'मातोश्री'चा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे, असे सांगत सरकारी निवासस्थान 'वर्षा'वर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री उद्धव यांना एक प्रश्न विचारण्यात आला, तुम्ही सरकारी निवासस्थानात कधी राहायला जाणार? त्यावर दोन शब्दात भाष्य केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अयोध्येत मोठी घोषणा केली. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ कोटी रूपयांचा निधी जाहीर केला. हा निधी राज्य सरकारकडून नाही तर शिवसेनेकडून देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच अयोध्येत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र भवन उभारणीसाठी जमीन देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली. मात्र या पत्रकार परिषदेत आपण अजूनही हिंदुत्वापासून दूर गेलेलं नाही हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भाजपपासून दूर गेलोय हिंदुत्वापासून नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. भाजप आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.